कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : युवक मंडळ पुसदद्वारा संचलीत तालुक्यातील जगदंबा माध्यमिक विद्यालय, शेलू बु. येथे भारत सरकार अंतर्गत मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले. त्याकरीता प्रमुख अतिथी म्हणून युवक मंडळचे सदस्य देवभाऊ जाधव हे होते. मुख्याध्यापक पी.बी जवादे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जवादे हे होते. देवभाऊ जाधव यांचे हस्ते विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक गणगणे यांनी केले तर आभार शिक्षक महाजन यांनी मानले. तसेच कार्यक्रमाला कुरमे, हाके, एन.जे. चव्हाण, डुकरे, डवले, लीपीक कांबळेसह प्र.प. एस. चव्हाण यांचे सहकार्य मिळाले.