कु. चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : वनीवारुळा मुंडगाव, तेल्हारा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हजारो निवेदन आंदोलन, उपोषणे झाली. पण काहीच उपयोग झालेला नाही, किंवा होत नाही. या रस्त्यावर श्री क्षेत्र मुंडगाव ला श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने व मुळ चरण पादुका मुळे पुणीत झालेले श्री गजानन महाराज पादुका संस्थान आहे. येथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. या संस्थानला महाराष्ट्र शासनाने ग्रामीण तिर्थक्षेत्र “ब” दर्जा दिला आहे. पण या ठीकाणी येणाऱ्या रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. संस्थान व गावकऱ्यांचा १०, १२ वर्षापासून रस्ता दुरुस्तीसाठी मागणी पाठपुरावा सुरू आहे. या रस्यावर अनेक अपघात होवुन अनेकांना कायमचे अपंगत्व आले. कित्येक बळी गेले. दररोज या रस्त्यावर अपघातग्रस्तांच्या सांडनाऱ्या रक्ताकरीता पादुका संस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून शासनाला व बांधकाम व संबंधित विभागाला, लोकप्रतिनिधी यांना दखल घेण्यासाठी दि ८ सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वनीवारुळा ते तेल्हारा रस्त्यावरील नागरिक या रक्तदानाच्या महायज्ञात रक्तदानाची आहुती स्वयंप्रेरणेने देणार आहेत. या आधी संस्थान द्वारा तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथे यात्रेला नवसपुर्ती करीता बोकळ बळी नेणाऱ्या मुंडगावातील काही भक्तांना परावृत्त करून बोकड बळीची अनिष्ट चालीरीती प्रथा बंद करण्याच्या हेतूने पादुका संस्थान येथे विश्वस्त मंडळाकडून रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे विशेष. आता वनीवारुळा तेल्हारा हा जिवघेण्या रस्त्या दुरुस्ती व्हावा या करीता श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव हे श्रींचे तमाम भक्त, युवा मंडळ, गणपती मंडळ, क्रिडा मंडळ, अॅटो युनियन, प्रवासी वाहन धारक व हा रस्ता दुरुस्त व्हावा या करीता झटणाऱ्या समाज सेवी वार्ताहर, पत्रकार बंधू यांना रक्तदान शिबीरात सहभागी होण्यासाठी आवाहन करीत आहे. सध्या जिल्ह्य़ात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. पादुका संस्थान च्या ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून श्रेष्ठ दान होणार आहे. व खराब रस्त्याला कारणीभूत असणाऱ्या संबंधितांचे हे रक्तदान शिबीर रक्तदाब वाढणार हे निश्चित.











