चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : शहरातील सोमवार वेस भागात १८ व्या शतकात रघुजी भोसले यानी बांधलेले सिद्धिविनायक मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. आजही शहराच्या पुरातन इतिहासाची हे मंदिर साक्ष देत आहे. गणेशमूर्ती ही डाव्या सोंडेची असते.परंतु या मंदिरातील काळया पाषाणातील ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असून, दूरदुरून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. अकोट शहराला पुरातन ऐतिहासिक वारसा आहे. नागपूर सुम्याचा कारभार सांभाळणारे रघुजी भोसले यांनी १८ व्या शतकात अकोटातील सोमवारवेस येथे सिद्धिविनायक मंदिर बांधले होते. यासंदर्भात एक आख्यायिका आहे ती अशी, सन १७५१ मध्ये रघुजी भोसले हे कर आणि शेतसारा वसुलीसाठी अकोट परिसरात आले होते. – निजामाला त्याची चाहूल लागताच त्याने रघुजी भोसलेंवर हल्ला केला. अकोटातील सोमवारवेस भागात रघुजी भोसले यांचा हत्तीखाना,घोडपागा आणि सैन्याची एक तुकडी होती. निजामाच्या अचानक हल्ल्यामुळे रघुजी भोसले यांनी या हत्तीखान्यात आश्रय घेतला, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यादिवशी संकष्ट चतुर्थी होती. गणेशानेच हतीच्या रूपात
आपले प्राण वाचवले म्हणून त्यांनी या ठिकाणी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले असे सांगितले जाते.अकोट परिसरातील अडगाव- सिरसोली येथे सन १८०२ मध्ये इंग्रज आणि मराठ्यांचे युद्ध झाले होते. त्यासाठी ती भोसले हे अकोट परिसरात आले होते.तशी शासकीय नोंददेखील अकोला डिस्ट्रिक्ट गॅझेटिअरमध्ये आहे. सिद्धिविनायक मंदिराबरोबरच भोसल्यांनी अकोट शहरात आणखी दोन गणेश मंदिराची बांधणी केल्याचे सांगितले जाते. नरसिंग महाराज मंदिराजवळ डाव्या सोंडेची प्राचीन गणपती मंदिर आहे. तर तिसरे गणपती मंदिर परकीय आक्रमणात नष्ट झाल्याचे भाविक सांगतात. सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी गणेश जयंती अत्यंत उत्सवात साजरी केली जाते. या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.परिसरात हे मंदिर आहे. आजही सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविक दूरवरून येत असतात.
मूर्तीचे रूप झाकले होते शेंदूराच्या पाख सिद्धिविनायक मंदिरातील मूर्ती : ही पूर्वी शेंदुरचर्चित भला मोठा तांदळा होता. मात्र, फेब्रुवारी २००१ मध्ये शेंदुराचा हा थर निखळल्याचे सांगितले जाते. त्या शेंदुराच्या लेपाखाली सिद्धिविनायकाची मूर्ती शाबूत दिसून आली. अतिशय सुंदर, मनमोहक, रेखीव, कोरीव आणि उजव्या सोंडेच्या गणेशमूर्तीचे हे मूळरूप अनेक वर्ष दुराखाली झाकलेले होते. साडेचार फूट उंच, ३ फूट रुंद अशी काळ्या पाषाणातील ही चतुर्भुज मूर्ती आहे. सिंहासनावर आरूढ असलेल्या या मूर्तीच्या डोक्यावर नागदेवता आहे. मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम झाले श्रमदानातून… अकोट शहरातील पुरातन सिद्धिविनायक मंदिर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. भाविकांनी काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम श्रमदानातून केले होते. दूरचे भाविक नेहमीच येथे दर्शनासाठी येत असतात. सोमवार वेस परिसरात हे मंदिर आहे.











