लक्ष्मण पवार
तालुका प्रतिनिधी सुरगाणा
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील घोडांबे ते रोटी रस्ता हा घोडं।बे ,रोटी ,हरंणटेकडी, या गावातील शेतकऱ्यांना व नागरिक, शाळकरी मुले यांना येजा करण्यासाठी परवडणारा रस्ता आहे.या रस्त्याला काही वर्षांपूर्वी काँक्रीट पुलाचे काम झाले आहे. शिवाय या रस्त्यावर काही क।ळी खडी पसरून काम झालेले दिसत आहे.या रस्त्यावरून शेतकरी पावसाळा असो की उन्हाळ। शेती करण्यासाठी चालत जावे लागते ,शिवाय उखलेल्या खडीतून मोठ्या मुश्कील ने जीव मुठीत धरून वाहन चालवीत असतात. घोडं।बे,रोटी, वांजुळपाडा ,येथील शेतकरीची जमीन या रस्त्याच्या आजू बाजूला असून याच रस्त्याचा उपयोग होतो. दुसरा रस्ता नाही.हा रस्ता डांबरी व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. अशा प्रकारे नागरिकांत चर्चा होते की रस्ता बनविण्यासाठी सांगावे तरी कुणाला सांगितले तर आवाज उठवणारा व रस्ता बांधकाम करेल असा वालीच दिसून येत नाही. त्यामुळे येथील शेतकरी शाळकरी मुले ,नागरिक मौन बाळगून असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून वर्षानुवर्षे हा रस्ता दुर्लक्षित आहे.तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी शेतकरी ,नागरिक, शाळकरी मुले,यांची येजा करण्याची अवस्था बघून तात्काळ या रस्त्याची पाहणी करून डांबरी रस्ता व ठीक ठिकाणी मोऱ्यांचे काम करावे अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून दबक्या आवाज।त होत आहे.











