माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा सहभाग
रविकुमार येमुर्ला
ग्रामीण प्रतिनिधी सिरोंचा
अहेरी : नगर पंचायत अंतर्गत झालेल्या कामांची व नियमबाह्यरित्या ले आऊटमध्ये शासकीय निधीचा वापर करुन शासनाचा दिशाभूल केलेल्याबाबत,तसेच लेआऊटधारकाकडून उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी दि 30 ऑगस्टपासून अहेरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला. यावेळी नगराध्यक्ष रोजा करपेत,नगरसेवक नवरास रियाज शेख,महेश बाकेवार, विलास सिडाम,कुमार गुरनुले, शैलेश पटवर्धन,नागेश कविराजवार, अविनाश गुरनुले, नेहा पठाण व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.