अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
डॉ.एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर द्वारा दि.१३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान ३ दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. किरण खंडारे प्राचार्य, डॉ.एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवाव्याख्याते राजेश पाटिल ताले(अध्यक्ष स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन), उदघाटक म्हणून मा.श्री.दीपक बाजड(तहसीलदार, पातूर),प्रमुख अतिथी म्हणून श्री. गुलाबरावजी ताले (अध्यक्ष श्री.सोपीनाथ महाराज संस्थान, दिग्रस), श्री.अशोकसिंह रघुवंशी (आजीवन सदस्य श्री.शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती),तसेच प्रा.हर्षद एकबोटे, प्रा.दिपाली गावंडे उपस्थित होते.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांचे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून राजेश पाटिल ताले यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ तसेच आजच्या काळात तररूणांचे देशाप्रती असलेली कर्तव्ये व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.राजेश पाटिल ताले स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेले कार्य अकोला जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय आहे तसेच ग्रुपचे कार्य आजच्या युवापिढी साठी मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. किरण खंडारे सर यांनी केले.महाविद्यालय विकास समितीच्या वतीने राजेश पाटिल ताले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनी, विरगाथा प्रदर्शनी,रांगोळी प्रदर्शनी व वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोनील आहाळे यांनी, प्रास्ताविक प्राचार्य डॉ.किरण खंडारे सर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. हर्षद एकबोटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री.नारायणराव अंधारे, प्रतीक ताले(उपाध्यक्ष, स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन),राहुल ताले (जनसंपर्क प्रमुख)तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी,सर्व प्राध्यापक,कर्मचारीवृंद तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

