महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : राज्याचे नवनियुक्त मंत्री विकासपुरुष ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रथम आगमनानिमित्य येथील टप्पा चौकात भाजपा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.नवीन सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.मुनगंटीवार यांचे प्रथमच आपल्या गृहजिल्ह्यात आगमन झाले. यावेळी ते मोटारीने चंद्रपूरला जात असताना भद्रावती तालुक्यातील नंदोरी, कोंढा फाटा, भद्रावती आणि घोडपेठ येथे जंगी स्वागत करण्यात आले. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेऊन बाईक रॅलीने मुनगंटीवार यांच्या ताफ्याला भद्रावती येथील टप्पा चौकापर्यंत आणून स्वागत केले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून भाऊंचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन भाऊंचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुका कोषाध्यक्ष रुपचंद धारणे यांनी पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी ना.मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून भद्रावती तालुक्यातील कर्नाटका-एम्टा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, ज्येष्ठ नेते अफझलभाई, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, भाजयुमोचे राज्य सचिव करण देवतळे, भाजपा नेते डॉ.अंकुश आगलावे, विजय वानखेडे, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सहसंयोजक संजय राय, माजी पं.स.सभापती प्रवीण ठेंगणे, विद्या कांबळे, अमित गुंडावार, इम्रान खान, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे, निशांत देवगडे, विशाल ठेंगणे, देवानंद मोरे, रामकृष्ण मेंढे, लता भोयर, प्रणिता शेंडे यांच्यासह शहरातील व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.