शंकर सोळंके
ग्रामिण प्रतिनिधी विवरा
बाळापुर : समोर NH.no 53 वर मो. सा. चालकांना व फोर, थ्री व्हिलर चालकांना थांबून मागील वर्षी व यावर्षी अकोला जिल्ह्यात झालेले अपघात व होणारे मृत्यू बाबत माहिती देऊन अपघाताचे मुख्य कारणाबाबत माहिती देऊन खालील प्रमाणे वाहतूक नियमान बाबत प्रबोधन करण्यात आले असून दरम्यान २० ते २५ व्यक्ती हजर होते.
1) मो. सा . चालावितांना नेहमी हेल्मेट चा वापर करावा.
2) मो. सा. चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा.
3) दारू पिऊन वाहन चालवू नये.
4) सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावे.
5) समोरील रोड क्लिअर असल्याबाबत खात्री करूनच ओव्हरटेक करावे.
6) वळणावर ओव्हरटेक करू नये.
7) मोटर सायकल चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे.
8) विरुद्ध दिशेने वाहन चालू नये.
9) अपघात समय मदत करावी.वरील सर्व नियमांचे पालन करा व आपण सुरक्षित , रहा व दुसऱ्याला सुरक्षित ठेवा, असे ते यावेळी सांगत होते.