विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : तालुक्यातील पातुर नंदापूर सर्वच परिसरामध्ये पावसाने हाहाकार माजवला पंचवीस दिवसापासून सूर्य नारायणाचे दर्शन झाले नाही.सुरुवातीला रिमझिम पाऊस आणि नंतर 17 जुलैपासून तीन दिवस लगातार अतिवृष्टी चा पाऊस एक दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि 22 जुलै पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली शेतकऱ्यांनी करावे तर काय हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुबार पेरणीचे संकट त्यात पावसाचा जोर सोयाबीन खुरपणी, डवरणी ला आले असता पावसाअभावी शेतकऱ्याला आपल्या शेतीची उगवलेल्या पिकाची मशागत करण्यासाठी वेळ मिळाला नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. संततधार पावसामुळे संपूर्ण शेतामध्ये तना चा प्रादुर्भाव जास्त दिसायला लागला तन नाशक फवारणी करून सुद्धा उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नदी आणि नाल्या काठी जमीन मध्ये पीक आणि माती सुद्धा खरडून गेली आहे सतत धार पावसा मुळे संपूर्ण जमिनी पाण्याखाली आहेत. शेतकरी वर्ग व मजुर वर्ग आपल्याला काम नसल्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखीन तीन दिवस मुसळधार पाऊस सांगण्यात आला असल्यामुळे मजूर वर्गाच्या घरच्या चुली सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. हाताला काम नाही तर खायचे काय असा प्रश्न शेतमजुरांना पडला आहे. पातुर नंदापूर परिसरामध्ये पावसाने हाहाकार माजवला. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या मताने लोकप्रतिनिधी निवडून गेले तो एकही लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघात शेतकऱ्याची एवढे नुकसान झाल्यानंतरही आसू पुसण्यासाठी कोणीच आले नाही. शेतकऱ्याला आपल्या कुटुंबाचे उदर पोषण करण्यासाठी शेती हाच व्यवसाय असल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून शेतकऱ्याचा घरचा गाडा कसा ओढायचा या च चिंतेत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परंतु एकाही लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच् दुःख दिसत नाही. आपल्या घरचे आपल्या पत्नी च्या अंगावरचे सोने विकून त्याचा पैसा आपल्या काळ्यामातीत मोती उगवण्यासाठी टाकणारा हा शेतकरी राजा आपल्या देशाच्या लेकराची खळणी भरण्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करून आपल्या जमिनीमध्ये घाम गाळ तो परंतु त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. अजूनही पाऊस थांबला नसल्यामुळे शेतकरी कठीण परिस्थितीचा सामना करीत आहे. लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांचे शेताची पाहणी करून ताबडतोब आर्थिक मदत पोहोचवण्याचे काम करावे अशी चींता ग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे.









