अविनाश पोहरे
ब्युरो चिफ अकोला
पातुर : आजादी का अमृत महोत्सवा निमित्त राष्ट्रीय महामार्ग व सडक निर्माण विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाच्या अतिथी अकोल्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा मॅडम तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले व इतर मान्यवारांच्या उपस्थिती मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमासाठी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विध्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदऊन वृक्षारोपण केले.महाविद्यालयाच्या रावे च्या विध्यार्थी विद्यार्थिनींची ह्या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात उपस्थिती होती असे कृषी महाविद्यालया कडून प्रा. ओम जाधव यांनी कळविले आहे.