महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : सततच्या अतिवृष्टीमुळे शहरातील तलाव तुडूंब भरले असुन शहरातील ऐतिहासिक वरदविनायक गणेश मंदिराशेजारील गवराळा तलावाचा ओव्हरफ्लो दि.१४रोज गुरुवारला पहाटेपासून सुरु झाल्याने परिसराला वाटर पार्कचे स्वरूप आले आहे. या ओव्हरफ्लो मधुन तलावातील मासे मोठ्या संख्येने वाहुन जात असुन त्याचा फटका येथील मत्स्यव्यवसायीकांना बसला आहे. हा ओव्हरफ्लो पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत असुन बच्चे कंपनी मात्र या ओव्हरफ्लो मधुन वाटर पार्क चा आनंद लुटत आहे. शहरात तथा तालुक्यात पावसाचा जोर काहिसा ओसरला असला तरी आणखी अतिवृष्टिची भिती मात्र कायम आहे. गेल्या तिन वर्षात यावर्षी प्रथमच या तलावाचा ओव्हरफ्लो पहिल्याच पावसात सुरु झाला आहे. शहरातील सर्वच लहानमोठे तलाव तुडूंब भरलेले असुन त्यांची पाणी साठविण्याची क्षमता संपलेली आहेभविष्यात हे तलाव फुटण्याची किंवा ओव्हरफ्लो होण्याची भिती आहे.


