प्रेम फारच सुंदर शब्द आहे. पण जेव्हा व्यक्तीचा प्रेमावरून विश्वास उठतो तेव्हा त्याचं मन तुटतं. असंच काहीसं एका प्रियकरासोबत झालं. जेव्हा त्याला त्याच्या प्रेयसीबाबत सत्य समजलं आणि त्याचा प्रेमावरील विश्वास उठला. त्यानंतर त्याने गर्लफ्रेन्डला ब्रेकअप लेटर लिहिलं. या ब्रेकअप लेटरमध्ये त्याने अशा गोष्टी लिहिल्या, ज्या वाचून तुम्ही विचारात पडाल. इतकंच काय तर तुम्ही पोट धरून हसालही. तरूणाचं ब्रेकअप लेटर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे ब्रेकअप लेटर एका बॉयफ्रेन्ड त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी लिहिलं आहे. बॉयफ्रेन्डने या ब्रेकअप लेटरमध्ये स्वत:ला त्याच्या गर्लफ्रेन्डचा मोठा भाऊ म्हटलं आहे आणि ब्रेकअप करण्यासाठी माफीही मागितली आहे. या लेटरमध्ये इतक्या मजेदार गोष्टी लिहिल्या आहे की, तुम्हाला हसू फुटेल. आता हे ब्रेकअप लेटर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलं आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सुजान नावाच्या बॉयफ्रेन्डने आपली गर्लफ्रेन्ड सुप्रियाला हे ब्रेकअफ लेटर लिहिलं. यात त्याने लिहिलं की, माझी प्रिय एक्स गर्लफ्रेन्ड 21व्या शतकात माझी हिंमत नाही की, मी तुझ्यासारख्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहू. त्यामुळे हे नातं मला इथेच संपवायचं आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला मोठा भाऊ समजून माफ कर’. या लेटरच्या शेवटी बॉयफ्रेन्डने फारच मजेदार लिहिलं आहे. त्याने लिहिलं की, ‘माझी बॉयफ्रेन्ड आणि वर्तमानातील मोठा भाऊ’. बॉयफेन्डचं हे ब्रेकअप लेटर आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे ब्रेकअप लेटर इन्स्टाग्रामवर ‘घंटा’ नावाच्या अकाउंटवर शेअऱ करण्यात आलं आहे. जे वाचून यूजर्स फारच मजेदार कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत याला 83 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.