राजमाता जिजाऊचे वंशज प्रा.नामदेवराव जाधव, मयंक गांधी, वैशाली माडे यांच्यासह नऊ रत्नांना जाहीर
सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर : दरवर्षी देण्यात येणारा डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार राजमाता जिजाऊचे वंशज प्रा.नामदेवराव जाधव यांच्यासह नऊ रत्नांना जाहिर करण्यात आला असून, दि.13 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता कुसूम सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. याच सोहळ्यात दरवर्षी 8 मार्च रोजी देण्यात येणारे कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मीमांसा फाऊंडेशन, व्हाईस ऑफ मिडीया, समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, पत्रकार प्रेस परिषद व ह्यूमन राईट्स फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी माजी गृहमंत्री, पाणीदार नेतृत्व, मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यातीलच नव्हे तर देशातील नामवंत व्यक्तीमत्वांचा डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत केल्या जातो. यंदाचे हे चौदावे वर्ष आहे. यावर्षी राजमाता जिजाऊचे वंशज तथा उद्योग मार्गदर्शक प्रा.नामदेवराव जाधव, ग्लोबल परळी मिशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकर्यांना आधुनिक शेतीसह जल व्यवस्थापनाचे धडे शिकवणारे मार्गदर्शक मयंक गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय राजकारणातील अनेक दिग्गजांची कॉफी टेबल बुक्स तयार करून क्रिएटिव्ह सेवा देणारे डॉ.नरेंद्र बोरलेपवार, दुभंगलेले ओठावर हजारो शस्त्रक्रिया करून लातूर येथे मोफत उपचार केंद्र चालवणारे डॉ.विठ्ठलराव लहाने, ग्रामीण भागातून जाऊन सिने जगतात नामांकीत झालेल्या गायीका वैशाली माडे, समाजसेवाच ही ईश्वर सेवा मानून दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत व गरजवंताना वैद्यकीय सेवा देणारे अभिजीत देशमुख, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे देऊन आता इंग्रजी शाळेतही संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे प्राचार्य सच्चीदानंद जोशी, शून्यातून विश्व निर्माण करत राजभोग आटासह वेग वेगळ्या व्यवसायात ब्रँड निर्माण करून शेकडोंना रोजगार देणारे विजय केंद्रे आणि खुलताबाद येथे शैक्षणीक संस्थेच्या मार्फत गरजूंना मदत करून सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे डॉ.मजहर खान यांना जाहिर करण्यात आला आहे. तरी सदरील पुरस्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वरजी धुमाळ, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, माजी पदाधिकारी सरवर खान, सौ.संगीताताई बारडकर, सौ.उज्वला दर्डा, सौ.सुनिता राठोड, सौ.सविता गबाळे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ.अरूणा पूरी, सौ.प्रणीता भरणे, शिवहरी गाढे तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.