अकोला : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- रविवार दि.19 रोजी सायंकाळी 6 वा.50 मि.नी तुषार सेलिब्रेशन, बाळापूर रोड जि.अकोला येथे आगमन व सायं. सात वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- तुषार सेलिब्रेशन, बाळापूर रोड जि.अकोला, त्यानंतर सोईनुसार शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व राखीव. रात्री नऊ वाजता अकोला रेल्वे स्टेशनकडे आगमन व विदर्भ एक्सप्रेसने प्रयाण.