किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात स्थानिक तुळसाबाई कावल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्वच शाखांचा निकाल हा यशाची परंपरा कायम राखणारा लागला आहे.तुळसाबाई कावल उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 94.92 टक्के लागला असून यामध्ये विज्ञान शाखा व वाणिज्य शाखांचा निकाल 100 टक्के तर कला शाखेचा निकाल 83. 75 टक्के लागला आहे.विज्ञान शाखेतून कु वैष्णवी बाळाभाऊ दांदळे 90 . 33 टक्के गुण घेऊन प्रथम तर अद्वैत गणेश देशमुख 90. 17 टक्के गुण घेऊन द्वितीय तर पियुष संतोषसिंह चांदेकर 88. 16 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे.वाणिज्य शाखेतून कु श्रेया घनश्याम मोकळकर 79.3 % गुण घेऊन प्रथम कु जोत्स्ना गणेश कोरडे 73 . 5 टक्के गुण घेऊन द्वितीय तर कु साक्षी सुरेश गावंडे 73 . 33 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. कला शाखेत कु भक्ती हरीश मेतकर 78.5 टक्के गुण घेऊन प्रथम , ज्ञानेश्वर अत्रिनंदन आवटे 77.5 टक्के गुण घेऊन द्वितीय तर कु. प्रतीक्षा भीमराव इंगळे 73 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. तालुक्यात फार मोजक्या ठिकाणी शिकविल्या जाणाया एचएससी व्होकेशनल अभ्यासक्रमा मध्ये सुद्धा तुळसाबाई कावल विद्यालयाच्या एच एस सी व्होकेशनल शाखेचा एकूण निकाल 89. 28 टक्के लागला आहे .यामध्ये फुड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी या विषयातून कु. पल्लवी संजय गुंजकर 70.5 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे . हॉर्टिकल्चर शाखेतून कुमारी साक्षी बोचरे 75.5 टक्के गुण घेऊन प्रथम तर इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स शाखेतून रोहन राऊत 69 टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे. विद्यार्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक तथा माजी प्राचार्य विजयसिंहजी गहीलोत सर , सचिव स्नेहप्रभादेवी गहीलोत मॅडम , प्राचार्य अंशुमनसिंह गहिलोत सर बेरार एज्युकेशन सोसायटी संचालक अजितसिंह गहिलोत सर , जगमोहन सर , अशोकसिंह गहिलोत सर, उपप्राचार्य एस बी चव्हाण सर , उपमुख्याध्यापक वाशिमकर मॅडम ,पर्यवेक्षक परमाळे मॅडम , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.


