किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चा निकाल आज दिनांक आठ जूनला दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकाल लावला आहे. विद्यालयातील एकूण 48 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह 26 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे तर प्रथम श्रेणी मध्ये 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये शाळेची विद्यार्थिनी कुमारी संजना सांगळे हिने 87. 33 % मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला असून अश्विनी जाधव हिने 82% मिळून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर प्रेरणा इंगळे हिने 81. 67 %गुण मिळवून क्रमांकाची मानकरी ठरली आहे. यासह विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. शैक्षणिक दृष्ट्या पंचक्रोशीत नाव कमावलेल्या सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट नियोजन व अनुभवी शिक्षक वर्ग, डिजिटल शिक्षण प्रणाली द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन दरवर्षीच विद्यालयाचे विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणी मिळवतात. यासाठी संस्थेचे सचिव सचिन ढोणे हे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया सुकर होण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात हे याठिकाणी उल्लेखनीय. प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक व शुभेच्छा देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी कंकाळ, शिक्षक पंजाब ननीर,दिनेश करोडदे, उद्धव काळपांडे,देविदास राठोड, लिपिक मनोज राखोंडे आदीसह शाळेतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना व पालकांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाची नियोजनबद्ध शिक्षण पद्धती आपले आई वडील शिक्षक वृंद यांना देतात.











