अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातूर : आज दि – 8 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला असून यामध्ये पातूर येथील वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा १०० % निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.या कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेत करीता यावर्षी एकूण ८४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते,त्यापैकी ५९ विद्यार्थी हे प्राविण्य श्रेणी सह उत्तीर्ण झाले आहेत तर २५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेमधून संकेत कल्याणकर या विद्यार्थ्याने ८५ .०० % गुण प्राप्त करून तो कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तसेच कु.शुभांगी बंड हिने ८४ . ८३% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला, तर अथर्व राऊत याने ८४. ६७ % गुण प्राप्त करून तृतिय क्रमांक प्राप्त केला, तसेच कु. किरण राठोड ८४. १७ %, कु. कोमल गुडधे ८३ . ६७ %, सिद्धांत उगले ८३. ५० ,कु. भारती तायडे ८३.१७% ,कु. समीक्षा इंगळे ८३.१७ %, वेदांत अत्तरकार ८३.१७ कु. पुनम बंड ८३.०० %, कु.पूनम साबळे ८२.५० % पवन तारापुरे ८२.१७ % गुण प्राप्त केले, आदी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या या कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा उत्कृष्ट अध्यापन व अतिरिक्त शिकवणी वर्ग यामुळे शक्य होत आहे. संस्थेचे संस्थापक सचिव रामसिंग जाधव साहेब यांनी महाविद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एम. सौंदळे तसेच पी.जे राठोड, ए.व्ही.सोनटक्के, प्रा.जे.डी. भारस्कर, प्रा.व्ही.आर. थोरात, प्रा आर एम.बचाटे, प्रा.एस.टी.गाडगे, प्रा एस. बी.आठवले, जी.एन. राऊत, सी .ए. वाघ, सौ.आर.ए. जाधव, सौ.आर. एस.देशमुख, सौ.के.डी.लोखंडे, एस.एच.जाधव आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले.