महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चंद्रपूर तर्फे भद्रावती तालुक्यातील चरुर (धा.) येथे जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला. राष्ट्रीय हरित सेना व नेहरू विद्यालय चंदनखेडा यांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शविला. यावेळी सामाजिक वनीकरण चंद्रपूरचे वनपाल एम. एन. सातभाई यांनी ‘पर्यावरण संरक्षण व संवर्धन काळाची गरज’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक महेश केदार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या आशा नन्नावरे, पंढरी हनवते, रुपेश केदार व नेहरु विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.