किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : पातुरच्या हिंदू स्मशानभूमीत दशक्रिया विधिकारिता येणाऱ्या आप्तेष्टना मुंडन करण्यासाठी आता आरामदायी सलून खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे. अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने केलेल्या आवाहनाला नाभिक समाजाने सकारात्मक प्रतिसाद देत सलून खुर्ची दान केली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने व्रत हाती घेतले आहे. या ठिकाणी विविध सोयी अभ्युदय फाउंडेशनने उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला नागरिक, सामाजिक संस्था प्रतिसाद देत आहेत. त्यानुसार दिवाकर राजनकर यांच्या आई द्वारकाबाई जयराम राजनकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पातुरच्या नाभिक समाजाने पुढाकार घेत नाभिक युवक दुकानदार संघटनेमार्फत सलून खुर्ची अभ्युदय फाउंडेशनच्या सेवाकार्याला अर्पण केली. दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना तसेच दिव्यांगना मुंडन करण्यासाठी खाली बसण्याचा त्रास होतो. यासाठी सलून खुर्चीची व्यवस्था स्मशानभूमीत असावी याबाबत अभ्युदय फाउंडेशनने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या सलून खुर्चीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नाभिक युवक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप खाकरे, तालुका अध्यक्ष विजय अंबुसकर, प्रमोद राजनकर, जगदीश निंबोकार, शाम राव, नरेंद्र लापूरकर, नरेंद्र घुले, विश्वास निंबोकार, जयदीप कुकडकर, राजूभाऊ चतारकर, अंबादास धानोकर, पुरुषोत्तम कुकडकर, विष्णू निंबोकार, आशिष राव, दत्ता निंबोकार, गोपाल चतारकर, संजय राव, बबन चतारकर, अमोल अंबुलकर, दत्ता राजनकर, विजय राजनकर, गजानन धामणकर आदींनी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रविण निलखन, दिलीप निमकंडे आदीं पदाधिकाऱ्यांना समर्पित केली.


