किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे एनसीसीच्या कॅडेट्सनी वृक्षदिंडी काढून पर्यावरण दिवस साजरा केला. इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चे लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला सर यांच्या मार्गदर्शना मध्ये जिल्ह्यामध्ये पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील एनसीसी विभागामार्फत पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. वृक्ष दिंडीचे आयोजन विद्यालया मधून पोलीस स्टेशन पातुर पर्यंत करण्यात आले. दिंडी मध्ये विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. विद्यालया मार्फत फळांचा राजा आंबा ची कलम हरीश गवळी ठाणेदार पोलीस स्टेशन पातुर यांना पर्यावरण दिनानिमित्त देण्यात आले. एनसीसी सार्जंट गौरी सरोदे वफाई खान पठाण यांच्या नेतृत्वात दिंडी काढण्यात आली .दिंडीला हिरवी झेंडी देण्याकरिता तालुका पत्रकार संघाचे प्रतिनिधी श्री सतीश सरोदे सर, शारीरिक शिक्षक श्री डी एम राणे सर उपस्थित होते. एनसीसी कॅडेट्स चे कौतुक प्राचार्य अंशुमनसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापक आर एस ढेंगे , पर्यवेक्षक एम बी परमाळे यांनी केले. एनसीसी कॅडेटस ला मार्गदर्शन सुभाष इंगळे एनसीसी ऑफिसर यांनी केले.