सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर : निलंगा येथे वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूचा ट्रक वर भविष्यात कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना एक खाजगी इसमास निलंग्याच्या तहसीलदार गणेश दिगंबर जाधव यास लातूर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली यासंदर्भात निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की निलंगा येथील रहिवासी असलेला तक्रारदार यांच्या या परिसरात वाळूच्या तीन ट्रक चालतात या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व भविष्यात कारवाई न करण्यासाठी निलंगा तहसीलदार गणेश दिगंबर जाधव याने प्रति ट्रक 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रमाणे दोन ट्रकचे 60 हजार रुपये प्रमाणे मागील तीन महिन्याचे 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु तडजोडी अंती 1 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारकरत्यास लाच द्यावयाची नसल्यामुळे त्यांनी लातूरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे 25 मे पासून तब्बल 4 वेळा या तक्रारीची पडताळणी करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार जाधव यांनी लाचेची रक्कम खाजगी एजंट रमेश गुंडेराव मोगरगे रा.शेंद ता. निलंगा जिल्हा लातूर यांच्या कडे देण्यासाठी सांगितली. त्याप्रमाणे शनिवारी (दिनांक 4) सकाळी तहसीलदार यांच्या घरासमोर सापळा लावण्यात आला आणि खाजगी एजंट रमेश मोगरगे यांनी निलंगा येथे तहसीलदार यांच्या घरासमोरच लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून यासंदर्भात पोलिसात तहसीलदार जाधव सह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक पंडित रेजित वाड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर हे करीत आहेत.मार्गदर्शन पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पस्तापुरे, पोह, रमाकांत चाटे, फारुख दामटे, भागवत कटारे,पो ना संतोष गिरी,पो का , शिवशंकर कचछवे ,अशिष क्षिरसागर, संदीप जाधव, दीपक कलवले, मंगेश कोंढरे,मपोकाॅ, रुपाली भोसले,पोकाॅ गजानन जाधव,चापोना राजू महाजन यांनी पार पाडली आहे.


