अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : पातूर येथे आज दि 25 मे 2022 रोजी स्मशान भूमी येथे रोजगार हमी योजना अंतर्गत केलेली वृक्षलागवड 1000 झाडापैकी 800 झाडे जिवंत आहेत. वृक्षाचे प्रमाण 80% जिवंत झाडे आहेत.परिसरातील पाहणी केली असता अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी समाधान व्यक्त केले व सचिव राहुल उंदरे यांचे अभिनंदन केले. अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम, मा. सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद अकोला, पातूर तहसीलदार मा. दीपक बाजड, राहुल शेळके गटविकास अधिकारी, उल्हास मोकळकर विस्तार अधिकारी पं.स.पातूर, व्ही.पी. दुधे गटविकास अधिकारी अकोला, मा. राहुल उंदरे ग्रामविकास अधिकारी, यांनी स्मशानभूमी मधल्या परिसरातील वृक्षाची पाहणी केली.यावेळी ग्रामपंचायत चे लिपिक हेमंत घुगे व कर्मचारी संजय खर्डे, प्रमोद उगले,अंबादास इंगळे, रोजगार सेवक सौ.रेणुका रामेकर,इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.