महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रवती दि.23:-अख्ख्या महाराष्ट्रात सर्वत्र गाजत असलेला धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब ठाणे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारा व सच्चा कार्यकर्ता कसा असावा हा बोध देणारा चित्रपट भद्रावती तील सोनल सिनेमॅक्स या टॉकीजमध्ये दिनांक १९/०५/२०२२ सायंकाळी ६.३० वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रपूर चे मुकेश जीवतोडे यांच्या मार्फत शिवसेना प्रेमी नागरिकांना मोफत बघण्यासाठी ठेवण्यात आला होता. चित्रपट सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुरुदय सम्राट स्व. श्री बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी भद्रावती शहर व तालुक्यातील तसेच वरोरा शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या चित्रपटाचा आस्वाद भद्रावती तालुका व शहरातील २५० नागरिकांनी घेतला. हा चित्रपट बघून नागरिक भारावून गेले होते .