महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : आज दिनांक 20/05/2022 रोजी स्थळ मधूमक्षिका पालन शेतकरी दत्तू नारायण येरगुडे, मौजा पिरली, ता. भद्रावती येथे तालुका कृषी अधिकारी भद्रावती आयोजित “जागतिक मधमाशी” दिनानिमित्य शेतकरी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर भाऊसाहेब बऱ्हाटे यांची उपस्थित होती.शेतकऱ्यांनी मधमाशापालन करुन उत्पादनात भर पाडावी व मधमाश्यांचे संगोपन करणे काळाची गरज आहे. याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा खादी ग्रामोउद्योग अधिकारी बी. एल. मेश्राम व दत्तू येरगुडे, पिरली यांनी मधमाशी पालन बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एम एस वरभे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा यांनी धान बियाणे 3 टक्के मिठाचे द्रावणाची बीजप्रक्रिया व सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणे बाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.कार्यक्रमाची प्रस्ताविक मंडळ कृषी अधिकारी, चंदनखेडा पी. जी. कोमटी यांनी केले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक भद्रावती विजय कवाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक भद्रावती सुधीर हिवसे यांनी केले. सदर कार्यक्रमाला यु बी झाडे, मं. कृषि अधिकारी भद्रावती, पी. एम. ठेंगणे, कृषी पर्यवेक्षक भद्रावती व क्षेत्रीय कर्मचारी व शेतकरी बंधू व भगिनी उपस्थित होते.











