अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शहरात आठ दिवसाआड होत असलेला पाणी पुरवठा व पाणी टंचाई वर लवकर तोडगा काढुण पातूर शहराला किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा जनेकरुन शहरातील जनतेची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगर परिषद पातूर चे गटनेते हिदायत खान रुम खान उर्फ इद्दु पहेलवान यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची भेट घेतली. हि भेट जळगाव जामोद येथील विश्रामगृह येथे घेण्यात आली. यावेळी पातूर शहरातील विविध समस्यावर चर्चा करून त्यावर तोडगा काढुण निवारण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष मो. महेताब, राष्ट्रवादी युवा कांग्रेस युवा नेता. अनिक पटेल सामाजिक कार्यकर्ते मो. शाकीर,उपस्थित होते.