अकोला जिल्ह्यातील पातुर तालुका मधील कार्ला या गावातील प्रथमेश तायडे ने पाटकावले गोल्ड मेडल
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला प्रथमेश तायडे कालाऀ याची भारतीय अंडर नाईन्टीन कबड्डी संघात निवड झाली आणि नेपाळ येथे झालेल्या अंडर नाईन्टीन कबड्डी स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने घवघवीत यश संपादन केले प्रथमेश तायडे ने एकुण झालेल्या चार कबड्डी सामळन्या मध्ये 40 गुण प्राप्त करून भारतीय कबड्डी संघाच्या विजया करीता मोलाची कामगिरी केली आहे या स्पर्धेतील इंडिया विरुद्ध नेपाळ या अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकून विजय प्राप्त केला आहे ,
प्रथमेश तायडे च्या या कामगिरीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशपातळीवर खेळण्याकरिता प्रोत्साहन मिळून ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी निर्माण होतील अशी अपेक्षा प्रथमेशने व्यक्त केली आहे प्रथमेश हा अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला विद्यार्थी असून त्याने या विजयाचे श्रेय आई, वडील व मामा गणेश उंबरकार , तसेच शिक्षक यांना दिले आहे प्रथमेश चे पातूर शहरातील महात्मा फुले स्मारक समिती व माळी युवक संघटना पातूर च्या वतीने प्रोत्साहन पर स्वागत केले आहे यावेळी। महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेंद्र उगले तथा माजी उपाध्यक्ष परिश्रम उंबरकर शिवसेना नेते सुनील गाडगे मोहन गाडगे संघटनेचे अध्यक्ष नितीन इंगळे पत्रकार किरण निमकडे अजिंक्य निमकडे किशोर फुलारी संदीप बड गणेश उंबरकर पिंकू तायडे ऋतिक हीरळ कार आदी सदस्य उपस्थित होते











