अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : स्काऊट गाईडमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका विद्यार्थ्याची निवड जिल्ह्यातुन करण्याचे ठरवले होते. राज्यसंस्थेच्या वतीने राज्य पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्याचे नाव जाहीर करण्यात आले असून यामध्ये अकोला जिल्ह्यातिल सत्र 2019 – 2020 मधुन एकमेव वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथील वर्ग 11 मध्ये शिकत असलेला शिवम संजय बगाडे ची स्काऊट राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यांत आली असून नुकतेच स्काऊट गाईड पॅव्हेलियन,मुंबई, दादर येथे 26 एप्रिल 2022 रोजी संपन्न झालेल्या भव्य सोहळ्यामध्ये शिवम बगाडेचा महामहीम राज्यपाल मा.भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र ,देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला मा.राज्यपाल भगतसिंह कोशारी,मा.ना.सुनील केदार क्रीडा व युवककल्याण मंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड,मा.ना आदितीताई तटकरे राज्यमंत्री,श्री ओमप्रकाश बकोरिया भा.प्र.से राज्य मुख्य आयुक्त,तथा आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्यतसेच श्रीयुत नागेश मोटे राज्य चिटणीस (अ.का) यांच्या उपस्थितीतव महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे दोन स्काऊट दोन गाईड प्रातिनिधिक स्वरूपातराज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमांमध्ये वसंतराव नाईक विद्यालयाचा विद्यार्थी शिवम बगाडेला मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्रमाणपत्र घेण्याची अविस्मरणीय संधी देण्यात आली ही पातुरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.शिवम बगाडेला मा. डॉ. सुचिता पाटेकर ,(शिक्षणाधिकारी माध्यमिक) स्काऊटर मार्गदर्शक पी.जे राठोड,(सहा. लिडर ट्रेनर) तसेच प्राचार्य एम. एम. सौंदळे आदींचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. शिवम बगाडेच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे संस्थेचे संस्थापक सचिव मा.रामसिंग जाधव यांनी शिवमचे प्रमाणपत्र कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिवम बगाडेच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.