अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : तालुक्यातील जवळच असलेल्या आगीखेड येथील अल्पभूधारक शेतकरी तसेच भाजयुमोचे जिल्हा सचिव श्री.शंकरराव नारायण जामोदे यांचा हृदयविकराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला.गुरुवारी अकोला येथे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवार दि : 22/04/ 2022 रोजी दुपारी अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी ते 45 वर्षाचे होते.अतिशय मनमिळाऊ स्वभावाने ओळखले जाणारे सर्वांच्या परिचित होते. त्यांचे दुःख सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाठीमागे दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे.