भामरागड तालुक्यातील समस्त नागरिक व भामरागड पट्टी पारंपरिक गोटुल समितीच्या वतीने जनआक्रोशाचे आयोजन
सौ.निलिमा बंडमवार
जिल्हा प्रतिनिंधी गडचिरोली
भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील मन्नेराजाराम जवळ असलेल्या गेर्रा येथील अल्पवयीन मुलीचे गावातील एका युवकाने बलात्कार करून हत्या केली होती.या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.हत्येच्या निषेर्धात दि.13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भामरागड येथे पर्लकोटा नदी ते तहसिल कार्यालया पर्यंत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.कु.मीना येर्रा सिडाम या मुलीचा जन्म भामरागड तालुक्यातील गेर्रा येथे दि. 2 मार्च 2004 रोजी झाला होता . मीनाचे आई – वडील अत्यंत गरीब असून हलाकीचे जिवन जगत आहेत . मीनाच्या डोळ्यात तिच्या आई – वडिलांनी आपला बदलणारा जीवन बघितला होता.मीनाला उच्च शिक्षित करुन वकील बनविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.म्हणून मीनाच्या आई – वडिलांनी मीनाला रेमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते तथा जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे शिकायला पाठविले.तीने लोकबिरादरीत पहीले ते 10 वर्गा पर्यंत शिक्षण घेतले.शालेय अहवालानुसार मीना हुशार व प्रामाणिक होती.10 वी नंतर ती पुढील शिक्षणाकरीता राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथे प्रवेश घेतला.मीनाची ही प्रगती गावातीलच सरपंचाच्या मुलाला बघवत नव्हती . त्याची वाईट दृष्टी मीनावर पडली . 17 वर्षीय मीनाला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे आमिष दाखवून बळजबरिने तिच्यावर बलात्कार केला.त्यातुन मीना गरोदर राहीली . मीना जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आली तेव्हा मीनाच्या आईला मीना गरोदर असल्याची चुनुक लागली होती.राक्षसी प्रवृत्तीच्या गेर्राे येथील युवक अविनाश रंगा मडावी याला आपल्या संबंधातून मीना गरोदर आहे याची माहिती झाली होती.मीनानेही अविनाश रंगा मडावी याला आपल्या प्रेमाचे प्रतीक तिच्या पोटात वाढत असल्याचे सांगितले होते.अविनाश रंगा मडावी याने मीना व्यतिरिक्त अन्य मुलींनाही लग्नाचे आमिश दाखवून बलात्कार केल्याची शक्यता नाकारता येत नाही.मीना गरोदर होती म्हणून तिला संपविण्याचे कट त्यांनी रचला . मीनाची हत्या करण्यापुर्वीच त्यांनी खड्डा खोदून ठेवला.दि 29 मार्च च्या रात्री जेव्हा मीना गावातीलच एका लग्न समारंभात होती तेव्हा अविनाश रंगा मडावी या नराधमाने मीनाला जबरदस्तीने गावालगतच्या नाल्याजवळील शेतावर घेऊन अनेक वेळा बलात्कार केला बलात्कार करुन मीनाच्या डोक्यात दगड आपटून मीनाची निर्घृन हत्या केली.हे अमानवीय व राक्षसी कृत्य अविनाश रंगा मडावी या नराधमाने केला.या अमानवीय व राक्षसी कृत्य करण्यास अविनाश रंगा मडावी याला घरातील अन्य सदस्यांनी मदत केली.म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेने अविनाश रंगा मडावी व गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्व आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी व या संपूर्ण अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी दि 13 एप्रिल रोजी भामरागड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.या निमित्याने तहसिलदार भामरागड यांचे न्यायालयात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी तालुक्यातील सर्व ग्रामसभांचे कार्यकर्ते,सर्व राजकीय पक्ष,सर्व व्यापारी प्रतिष्ठाण,सामाजिक संस्था , संघटना , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनी व पालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन भामरागड तालुक्यातील समस्त नागरिक व भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समिती कडुन प्रसिद्धी पञकाव्दारे करण्यात आले आहे.











