किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : राज्यसंस्थेच्या वतीने 2018- 19 व 2019- 20 या शैक्षणिक सत्रात स्काऊट गाईडमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका विद्यार्थ्याची निवड जिल्ह्यातुन करण्याचे ठरवले होते. राज्यसंस्थेच्या वतीने राज्य पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्याचे नाव जाहीर करण्यात आले असून यामध्ये अकोला जिल्ह्यातिल सत्र 2019 – 2020 मधुन एकमेव वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथील वर्ग 11 मध्ये शिकत असलेला शिवम संजय बगाडे ची स्काऊट राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यांत आली आहे.स्काऊट गाईड पॅव्हेलियन दादर मुंबई, येथे 26 एप्रिल 2022 रोजी संपन्न होणाऱ्या भव्य सोहळ्यामध्ये शिवम बगाडेचा महामहीम राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे.
यापूर्वीसुद्धा राज्यसंस्थेने राष्ट्रिय स्तरावरिल राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षा स्काऊट विभाग आयोजीत राज्य प्रशिक्षण केंद्र रामटेक जिल्हा नागपूर च्या वतीने 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2022 च्या दरम्यान केले होते.या चाचणीसाठी वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर येथील शिवम संजय बगाडे, ऋतिक विक्रम राठोड, विश्वास दत्तराव घुगे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती पुरस्कार स्काऊट पूर्व चाचणीसाठी आपला सहभाग नोंदवला होता व या चाचणीमध्ये सुद्धा सदर् र्विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना मा. डॉ. सुचिता पाटेकर ,( शिक्षणाधिकारी माध्यमिक), डॉ. वैशाली ठग (शिक्षणाधिकारी प्राथमिक) यांच्या प्रेरणेने तसेच भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था अकोला येथील मनिषा तराळे (जिल्हा गाईड संघटक )महेंद्र वसावे (जिल्हा संघटक स्काऊ)यांच्या सहकार्याने स्काऊटर मार्गदर्शक पी.जे राठोड,(सहा. लिडर ट्रेनर) तसेच प्राचार्य एस एम सौंदळे आदींचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. शिवम बगाडेच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक/ सचिव माननीय रामसिंगजी जाधव साहेब यांनीं शिवमचा त्याच्या आई-वडिलांसह पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य,एस एम सौंदळे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.शिवमच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.











