सौ.निलिमा बंडमवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील माजी जि. प. सदस्य लालसू नोगोटी व माजी पं. स. सभापती गोई कोडापे यांनी दि.9 एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम गावाजवळ असलेल्या गेर्रा येथे जाऊन मृतक मीना सिडाम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.भेटीदरम्यान लालसू नोगोटी व गोई कोडापे यांनी मीना येर्रा सिडाम यांच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली व संपूर्ण प्रकार समजून घेतला. या वेळी गावातील अन्य महिला व पुरुष उपस्थित होते.मृतक मीना सिडाम ही अल्पवयीन मुलगी होती. गावातीलच म्हणजे मौजा गेर्रा येथील युवक अविनाश रंगा मड़ावी यांनी मीना सिडाम या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा प्रकार 5 एप्रिल रोजी समोर आला आहे.हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी गावालगतच्या नाल्यात सदर मुलीचे मृतदेह जमिनीत पुरला.या संपुर्ण प्रकाराने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.लालसू नोगोटी व गोई कोडापे यांच्याशी चर्चा करतांना कुटुंबीयानी व गावकऱ्यानी दोषीवर कड़क कार्यवाही होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे.ज्यामुळे भविष्यात अशा गुन्हाना आळा बसेल.असे मत यावेळी व्यक्त केले.या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी गावकऱ्याशी चर्चा करतांना म्हणाले की,हा संपूर्ण प्रकार आदिवासी समुदायासाठी कलंक आहे.आदिवासी समुदायात बलात्कार,चोरी,फसवणूक होत नाहीत.असे आपण नेहमीच वेगवेगळ्या मंचावर सांगत आलो आहे.परंतू या संपूर्ण घटनेने आदिवासी समुदायांना फार मोठा धक्का पोहचला असून अशा नाराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.यासाठी पीड़ित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जनतेच्या वतीने व्यापक आन्दोलन करण्यास आपण तयार आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी गोईताई कोडापे यांनीही दुःख व्यक्त करून पीड़ित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणे हीच खरी मृतक मीनासाठी श्रद्धांजली असेल असे मत व्यक्त केले.सदर हत्या प्रकरणात आरोपी अविनाश रंगा मड़ावी याच्यासह अन्य व्यक्तीचाही सहभाग असल्याचे मत गेर्रा येथील नागरिकांनी व्यक्त करीत पोलीस विभागाने योग्य चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.


