विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : श्रीराम नवमी, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, रमजान महिना कोरोना नियम शि तील झाल्यामुळे दि. 9 एप्रिल रोजी आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत मेन रोड , जामा मस्जिद, ग्रामपंचायत चौक, बस स्टॉप, येथून रूट मार्च करण्यात आला. यावेळी कानडी मध्ये कॉर्नर सभा घेण्यात आल्या त्याप्रसंगी नागरिकांना आगामी सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेचअक्षपाई धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. या पथसंचलना मध्ये पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक बंडू मेश्राम, पिंजर बीड जमदार रमेश पाटील खंडारे , कानडी बीडचे जमादार राजू वानखडे, अभिजीत शिरसाठ , रोशन पवार, नागोराव बेलुरकर, अशोक देशमुख, संतोष हिरळकर, गोपाल आकोटकर, भगवान म्हात्रे, भिका सिंग जाधव, सुदाम राठोड, धनराज राऊत, संतोष वाघमारे, सतीश कथे, मुकेश जाधव, श्रीकांत अजलसाडे, व 12 होमगार्ड सहभागी झाले होते. पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे यांनी शांतता कमिटीच्या सदस्यांना बैठक बोलावून सर्वांना सूचना दिल्या.


