अकोला,दि. 8 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यानुसार आज(दि.8) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत निकिता तेलगोटे, प्रतिक अवसरमोल, कांचन वानखडे, आशुतोष दामोधर व प्रशिक वाहूरवाघ या विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यांत आले. तसेच कार्यक्रमामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त लाभार्थ्यानां प्रमाणपत्र देण्यात आले. हा उपक्रम समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी डि.एम. पुंड व विशेष अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रदीप सुसतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशवंत खंडारे तर आभार प्रदर्शन सिंधू वानखडे यांनी केले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी सहायक लेखाधिकारी योगेश दांदळे विशाल भगत तसेच कार्यालयीन कर्मचारी व विविध महाविद्यालयाचे प्रतिनिधी व बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.