अमरावती दि. 5 :- माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2021-22 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी दिनांक 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन 2020-21 साठी री-अप्लाय करण्याकरिता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दिनांक 30 एप्रिल तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी दिनांक 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटीच्या या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणीकृत करावे. याबाबत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सूचना फलक लावून विहित मुदतीत नोंदणीकृत अर्ज सादर करण्याची कार्यवाही करावी. तसेच पात्र अर्जदारांनी आपले अर्ज नोंदणीकृत करून ऑनलाईन महाविद्यालयांकडे सादर करावेत. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.
महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकाणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंट बॅक केलेल्या अर्जाची त्रृटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी पत्रकाव्दारे केले आहे.