अकोला दि.5 : हिरपूर ता.मूर्तिजापूर येथील नाथ जोगी समाजाच्या कुटुंबांना घरकुल योजनेतून लाभ मिळवून द्यावा, तसेच त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार करता यावा यासाठी आवश्यक अर्थसहाय्य देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करावा,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी (दि.4) येथे दिले.
नाथ समाजाच्या कुटुंबांना हिरपूर ता. मुर्तिजापूर येथे घरकूल योजनेचा लाभ देण्याबाबत बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा नियोजन भवनात आयोजित याबैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री कडू म्हणाले की, नाथपंथी जोगी समाजाच्या कुटुंबांना त्यांच्या ज्या शासकीय जमीनीवर अतिक्रमणे असल्यास ती विहित मर्यादेत नियमानुकूल करण्याबाबत कार्यवाही करून घरकुलाचा लाभ द्यावा. तसेच या समाजातील युवकांना स्वरोजगार प्रशिक्षण देण्यात यावे,व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे.तसेच त्यांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे,असे निर्देश त्यांनी दिले.