अकोला दि.3 : राज्या जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमळवार दि.4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सोमवार दि.4- सकाळी 11 वा. श्रामनेर शिबीर व धम्म शिबिर या कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- मंगरुळ कांबे ता. मुर्तिजापूर. दुपारी साडेबारा वा. साई अन्नपूर्णा संस्था बेंगलूरु या संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप कार्यक्रम उद्घाटन, स्थळ- राधा मंगलम हॉल, तिडके नगर, मुर्तिजापूर. दुपारी एक वा. मुर्तिजापूर येथून अकोलाकडे रवाना, दुपारी पावणे दोन वा. पालकमंत्री नोंदणी पंधरवाडा अनुषंगाने आढावा सभा, स्थळ शेतकरी सदन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, दुपारी तीन वा. विजय शिंदे व श्रीमती सुकेशिनी तेलमोरे यांच्या तक्रारी अर्जांबाबत बैठक, दुपारी साडेतीन वा. योगेश तिहिले व समस्त नाथ समाज रा. हिरपूर ता. मुर्तिजापूर यांना घरकूल योजनेचा लाभ देण्याबाबत बैठक, दुपारी चार वा. क्रीडा विभागाच्या विविध विषयांवर आढावा बैठक स्थळ- जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. सायं. पाच वा. स्व. ललिताबाई आनंदराव गावंडे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट, सायं. सात वा. सांस्कृतिक भवन निर्मिती सहाय्य कृतज्ञता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- सांस्कृतिक भवन जुने क्रीडा संकूल परिसर, अकोला.