नागपूर : कथित १०० कोटी वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या जेलमध्ये आहेत. यामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख काटोलमध्ये कामाला लागल्याने राष्ट्रवादी अलर्टवर आहे. अनिल देशमुखांच्या काटोल मतदार संघात राष्ट्रवादीची पकड मजबूत राहावी यासाठी नागपुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या हालचालींमुळे राष्ट्रवादी अलर्ट झाली आहे. नागपुरात राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते अनिल देशमुखांच्या मतदार संघात येणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार काटोल दौऱ्यावर येणार आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला काटोलचा दौरा केला. काटोल मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड मजबूत रहावी म्हणुन प्रयत्न सुरु आहेत.
देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर अनेक छापे टाकूनही ईडी, सीबीआयने काहीही केले नाही. आता तो तुरुंगातून बाहेर येतील आणि पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दिसतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर सरड्यासारखा रंग बदलला आहे. परमबीर सिंग यांच्यासारखे भ्रष्ट व्यक्ती अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आयकर छापा किंवा ईडी, काहीही साध्य होणार नाही. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांचा राजीनामा चूक मानला आहे. यावरून भाजप सातत्याने आघाडीविरोधात षडयंत्र रचत असल्याचे सिद्ध झाले. याचे उत्तर त्यांना लवकरच मिळेल असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला.

