पुणे : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. रविवारी हा चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. अभिजित शशिकांत शिंदे (३८) असे मृताचे नाव आहे. चिंचवडमध्ये रविवारी ही घटना घडली. अहवालानुसार, मृत तरुणावर हिंदुत्ववादी संघटनांचा प्रभाव होता. 21 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहिल्यानंतर जवळपास तासभर त्याने मित्रांशी चर्चा केली. त्यानंतर तो कोणाशीही न बोलता थेट झोपी गेला. सकाळी अभिजीतचे वडील खोलीत गेले असता तो बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांना दिसले.
यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तात्काळ अभिजीतला खासगी रुग्णालयात नेले. अभिजीतला सकाळी ब्रेन स्ट्रोक झाला आणि मेंदूला रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी फुटल्याने त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगीतले. अभिजीतला उच्च रक्तदाब असल्याने तो खूप संवेदनशील होता. 11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. हा चित्रपट 1990 च्या दशकात काश्मीरमधील नरसंहार आणि काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, दर्शन कुमार यांसारखे कलाकार दिसले आहेत. या चित्रपटाने जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.