मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
तेल्हारा : कु.भक्ति अविनाश घावट हिवरखेड येथील श्रीकृष्ण घावट यांची नात असून श्री जोगेशवर इंग्लिश प्राथमिक स्कूल वाडेगाव येथे वर्ग ५ मध्ये शिकत होति. वर्ग ६ वी करिता नवोदय विध्यालय आकोला येथे निवड झालेली आहे त्यामुळे सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे . वडिल अविनाश घावट हे पोस्ट ऑफिस मध्ये असिस्टेंट असुन आई सौ प्रियाराणी आवीनाश घावट हि शिक्षका आहे. कु.भक्ति आपल्या यशाचे श्रेय आई, वडिल,आजी, आजोबा तसेच वर्ग शिक्षीका मंगलाताई येवले, संस्थाध्यक्ष सतोषदादा मानकर , मुख्याध्यापक पूनम गावंडे तसेच विशेष सहकार्य श्री मंगेश सरप यांना देते.
कुं. भक्ति चे समता समुह शिक्षक गटा चे अरुण निमकर्डे, राजेश रहाटे यांनी कौतुक केले आहे.

