महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भद्रावती येथिल भोजवार्ड व किल्लावार्ड येथील रहिवाशी महिला बालकांचा होळीच्या निमित्ताने पर्यावरण पूरक नवा उल्लेखनीय उपक्रम दरवर्षी होळीच्या निमित्ताने हजारो झाडांची कत्तल करून वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या गावी झाडांची कत्तल करून झाडांची होळी पेटवली जाते. त्यातून पर्यावरण पूरक वातावरण नष्ट होऊन पर्यावरणाचा विनाशाकडे पाऊल पुढे चालले आहे परंतु भद्रावती येथील नैसर्गिक पर्यावरण संरक्षण व मानवता विकास संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे यांचा मार्गदर्शनात भोज वार्डमधील बालक व महिला च्या माध्यमातून जे जमिनीमध्ये नष्ट नाही होत उदाहरण प्लास्टिक फायबर इत्यादी वस्तूंचा व किल्ल्याच्या पटांगणावर असलेल्या हनुमान मंदिर परिसर स्वच्छ करून परिसरातील प्लास्टिक फायबर अन्य कचरा गोळा करून पर्यावरण पूरक होळी भोज व किल्ला वार्ड वासियांनी आनंदात साजरी केली याप्रसंगी नैसर्गिक पर्यावरण संरक्षण व मानवता विकास समितीचे महिला कार्यकर्त्या वैदेही राऊत ,वसुधा राऊत , ज्योती मते , चौधरी , नैना लोणकर , अश्विनी चटपल्लीवार, सारिका मुळे, त्याचप्रमाणे स्थानिक बालक रेणुका, राऊत यशस्वी श्रीरामे दुर्गा राऊत, वैष्णवी घोडमारे ,पायल तांती, राधा कवासे , श्रावणी चौधरी, युगांत मुळे, यश मुळे , मानव आत्रम, संकल्प उपगनलावर ,कृष्णा राऊत, कल्पेश राऊत, ऋषिकेश राऊत, मनस्वी खोडे ,गणेश घोडमारे ,आदी उपस्थिती होती व प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रमाणपत्र देऊन उल्लेखनीय कार्य कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला