महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : पदावली भजन मंडळातून लहान मुलांवर योग्य संस्कार घडतात असे प्रतिपादन केंद्रीय मानवाधिकार संघठन नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी जय बजरंग पदावली भजन मंडळ, नागलोन येथील पदावली भजन स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी केले.वारकरी संप्रदाय, श्री गुरूदेव सेवा मंडळ सारखेच पदावली भजन मंडळ असून त्याचा लोप पावत असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले. नागलोन येथील युवा पिढींनी पदावली भजनाचे अध्ययन करून स्पर्धेचे आयोजन केले. पदावली भजनाचा लोप पावत असल्याने या भजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेव्दारे पदावली भजनाचे पुनर्जिवन युवा पिढीव्दारे करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी डॉ. आगलावे यांनी म्हटले की नागलोन गांव हे तंटामुक्ती गांव आहे या गावातील भांडणाच्या तक्रारी नसुन गांव हे पुर्णपणे तंटा मुक्त आहे. तसेच एकही तक्राराची नोंद पोलीस स्टेशन मध्ये नाही. डॉ. आगलावे यांनी सर्व भजन मंडळांना आवाहन केले की महाविकास आघाडी सरकारच्या किराणा दुकानातुन दारू विक्रीचा निषेध सर्व भजन मंडळाने ठराव मांडून करावा.या स्पर्धेत भाग घेणारे भजन मंडळातील उत्कृष्ठ ढोलकी वादक, पदगान ,गौळण, पोषाख, व उत्कृष्ठ छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा सादरीकरण करणा-या भजन मंडळास वैयक्तिक बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अ. भा. गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रमाचे पदाधिकारी लक्ष्मणराव गमे होते . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य प्रविणभाऊ सुर, पं.स.सदस्य चिंतामण आत्राम, सहा.पोलिस निरीक्षक अजितसिंग देवरे, अ.भा.श्री गुरूदेव सेवामंडळचे प्रा. रूपलालजी कावळे, ग्रामगीताचार्य अतुल खापने, सरपंच रवी ढवस, उपसरपंच शुभांगी ढवस, ग्रामसेविका दर्शनाताई इंदोरकर, माजी सरपंच विदयाताई ढवस, पोलीस पाटील त्रिमुर्ती महाजन, तंटामुक्ती अध्यक्ष कवडू चोपने, ग्रा.पं. सदस्य गजानन ढवस, प्रदीप सोयाम, मनिषा ढवस, पुजाताई ढवस, सुजाता महातळे, गजानन वासेकर तसेच नागलोन येथील गुरूदेव सेवा भजन मंडळ, जय बजरंग पदावली भजन मंडळ, जय जगन्नाथ महिला भजन मंडळ या भजन मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .