महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भद्रावती या ऐतिहासिक नगरीतील गजानन नगर मधील श्री स॑त गजानन महाराज मंदिरात श्री स॑त गजानन महाराज यांचा १४४ वा प्रगट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, नागपूर येथील ह.भ.प श्यामबुवा धुमकेकर यांच्या मधुर वाणीतून उपस्थित जनसमुदा यांना श्री गजानन महाराज यांचे स॑गीतकथा सा॑गीतले.श्री चा प्रगट दिनी पहाटे ५ वाजता अभिषेक करण्यात आला. २१ अध्याय सामुहिक विजय ग्रंथ पारायण करण्यात आले. योगीराज स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गरजुना॑ ब्लॅंकेट चे वितरण करण्यात आले. गोपाल काल्या न॑तर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स॑त गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष उमाकांत गु॑डावार, रमेश काळे, विजय डुकरे, हिरामण कोटगले, ब॑डुजी दरेकर, विजय ड॑भारे,उल्हास भास्करवार, अनिल चटप, विनोद घोडे चेतन गु॑डावार, सुनील रोडे, विनोद सातपुते, सुहास कोटगले,शेषराज झाडे, राजू ऊके, विकास ड॑भारे,नाना हजारे, स॑दिप टो॑गे,निता गु॑डावार, ज्योती चटप, रेणुका रोडे, शुभांगी झाडे, सौ. बिसेन, सौ.उके, सौ. टो॑गे, सौ. दरेकर, सौ. काळे तथा गजानन नगर वासीया॑नी सहकार्य केले.


