किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : तुळसाबाई कावल विद्यालयात राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त दरवर्षी मराठी राजभाषा दिन नावाचा कार्यक्रम राज्यभर साजरा होत असतो. राज्यभाषा दिन निमित्त औचित्य साधून स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून राजभाषा दिन साजरा केला. यावेळी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीतावर विद्यार्थ्यांकडून अप्रतिम नृत्य सादर केले गेले. विविध विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली.
अधिक बातम्या वाचा :
- शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी लक्ष्मण शिंदे यांची निवड
- जि.प.शाळा खवणे पिंपरी येथे शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध निवड
- सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची सीआयएसएफ मध्ये नियुक्ती
- सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू निषेधार्थ पैठण येथे सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन
- कलावंत न्याय हक्क समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी विनायकराव माने
तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंशुमनसिंह गहिलोत व कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी अस्सल महाराष्ट्रातील खेळ लेझीम नृत्य सादर करून मंचयांच्यापर्यंत आणले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंशुमनसिंह गहिलोत यांनी केले. मराठी भाषा वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी काय केले पाहिजे ह्याबद्दल उपस्थितांना प्रा. पाकदुने सरांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना मराठीची प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र, सेनेच्या विद्यार्थी मराठी विषयाचे शिक्षक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य एस बी ठाकरे ,अंशुमनसिंह गहिलोत,कीर्ती गहिलोत, पी एम कारसकर ,के बी इंगळे, जी एम निमकंडे, एस जी सुरवाडे ,पी एस उंबरकार प्रा. एन यु पाकदुणे, बी आर राजगडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंशुमनसिंग गहिलोत, कार्यक्रमाचे संचालन प्रेरणा राठोड, सानिका उगले आभार प्रदर्शन आस्था पवार यांनी केले.