अमरावती : येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील रिक्त असलेल्या शिक्षण सहायक संचालक पदावर रवींद्र वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमरावती विभागीय शिक्षण मंडळात कार्यरत असलेल्या डॉ.जयश्री राऊत यांची यवतमाळच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. राज्यातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट आणि प्रशासन शाखेतील उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तेजराव काळे यांची अमरावती विभागीय शिक्षण मंडळात बदली झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहायक शिक्षण संचालक पद रिक्त होते. आता या पदावर रवींद्र वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती विभागीय शिक्षण मंडळात सहायक सचिव पदावर कार्यरत असलेल्या डॉ.जयश्री राऊत यांची यवतमाळच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. विशेष म्हणजे सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा कालावधी जवळ असतानाच त्यांची बढती झाली आहे. राज्यातील 52 अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने ही पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.