सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : पंचायत समिती सिरोंचा येथे अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली दि.11 फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या सभागृहात तालूक्यातील सर्व विभागाचे अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात आली आहे.बैठकीत तालुक्यातील शिक्षण विभाग बांधकाम विभाग,वनविभाग,कृषी विभाग,महावितरन व सर्व विभागातील अधिकाऱ्यांना विकास कामातील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सविस्तर चर्चा करुन विकास कामे तातडीने करण्याचे आदेश दिले.एप्रिल महिन्यांत होणाऱ्या पुष्कर यात्रेच्या तयारी साठीही चर्चा करण्यात आले.त्यावेळी प्रामुख्याने सिरोंचाचे तहसिलदार जितेंद्र सिकतोडे,गट विकास अधिकारी डाँ.विकास घोडे,नायब तहसिलदार हमीद सय्यद,पंचायत समिती सिरोंचाचे सभापती सत्यम मोडेम,उप सभापती कृष्णमूर्ती रिक्कूला व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी व राष्ट्रवादी काँग्रेस चे नगर सेवक,पंचायत सदस्य व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.










