नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले आंदोलन
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : ९ फेब्रुवारी रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्त (मुख्याधिकारी सवर्ग) डॉ. प्रविण आष्टीकर कार्यालयीन कामकाजानिमित्य राजापेठ रेल्वे अंडरपास या ठिकाणी स्थळ निरिक्षणा करिता गेले असता काही महिलांनी अंगावर व चेह-यावर शाई फेकली. या घटनेचा भद्रावती नगर परिषद मधील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून दि.१० फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले. या आंदोलनात मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. अमरावती महानगरपालिका आयुक्त (मुख्याधिकारी सवर्ग) डॉ. प्रविण आष्टीकर यांच्यावर हल्ला करणा-या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी यावेळी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

