महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे याच कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत असलेल्या निकेश शंकर पचारे या विद्यार्थ्याला आजारावर उपचार करण्याकरिता नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली. निकेश शंकर पचारे हा विद्यार्थी बोन कॅन्सर या आजाराने ग्रस्त असून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथे मागील दहा महिन्यांपासून उपचार घेत आहे. एक सामाजिक दायित्व या नात्याने लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती तर्फे या विद्यार्थ्याला आर्थिक मदत करण्यात आली. सदर रक्कम प्राचार्य बंडू दरेकर यांच्या हस्ते निकेशचे वडील शंकर पचारे यांना सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आशालता सोनटक्के, पर्यवेक्षक लक्ष्मण बोढाले व ज्येष्ठ शिक्षक रुपचंद धारणे उपस्थित होते.