महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२८:-गावागावांत आरोग्य शिबीरांचे आयोजन करुन गरीब, शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग यांना मोफत उपचार मिळणे गरजेचे असून आरोग्य शिबीरे काळाची गरज असल्याचे मत ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा गुरुदेव प्रचारक डॉ.अंकुश आगलावे यांनी व्यक्त केले.ते दत्ता मेघे, आयुर्विज्ञान संस्था विद्यापीठ व्दारा संचालित महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय रूग्णालय तथा अनुसंधान केंद्र, सालोड (हि.) वर्धा तथा किसानपुत्र शेतकरी संघटना जि. चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमानाने सर्व रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिराचे आयोजन बेलगाव, नंदोरी व कोंढा येथे नुकतेच करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबीराचे आयोजन अर्चना जीवतोडे, प्रविण ठेंगणे, डॉ. अंकुश आगलावे व नरेंद्र जीवतोडे यांच्यातर्फे करण्यात आले
होते.यावेळी डॉ. अंकुश आगलावे यांनी उद्घाटन प्रसंगी संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साक्षीने व प्रेरणेतून या उपचार व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मार्गदर्शनपर संबोधनातून सांगितले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, आरोग्य शिबीरातून गरीबांची सेवा करावी असेही डॉ. आगलावे यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगतले.
सदर रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबीरात २० ते २५ गावांतील रूग्णांनी लाभ घेतला. या शिबीरात निशुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात अनेक आराजांचा समावेश होता. . तसेच रूग्णांचे ऑपरेशन देखिल सावंगी येथे निशुल्क करण्यात आले. निशुल्क डोळयाची तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. या शिबीराचे आयोजन आदर्श गांव नंदोरी येथे हनुमान मंदीरात करण्यात आले.
रोगनिदान शिबीरात महात्मा फुले आरोग्य योजना, आयुष्यमान योजनाचे फायदे सांगितल्या गेले तसेच योजनेचा भरपूर प्रमाणात फायदा गावातील नागरिकांना व्हावा या करीता मार्गदर्शन देण्यात आले. भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक व्याधीग्रस्त रूग्णांनी या रोग निदान व आयुर्वेदोपचार शिबीराचा लाभ घेतला