चंद्रपूर दि. 17 डिसेंबर : जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक तसेच नागभीड नगर परिषदेमधील पोट निवडणुकीकरीता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त नगर परिषद / पंचायतीमधील सार्वत्रिक / पोट निवडणुकीकरीता मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवार दि. 20 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता नंतर जाहीर प्रचारावर बंदी असेल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.