महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२७:-औरंगाबाद येथील सी. एस. एम. एस. कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंजली किशोर ताटेवार हीने येथील एका प्रगतीशील शेतीला भेट देऊन शेतीची माहिती नुकतीच जाणून घेतली. येथील प्रगतीशील शेतकरी भास्करराव आणि गुलाबराव ना.कन्नमवार हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी आपल्या साडे तीन एकर शेतीमध्ये पाच लाखाचे भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले आहे. त्यात त्यांनी पाले भाज्या, वांगे, फुलकोबी, शेंगा आदी पिके घेतली आहेत. तसेच आर्गानिक पद्धतीने केळीच्या बागेची लागवड केली आहे. शेती व्यवसायातून कन्नमवार यांनी दहा लाखाचा निव्वळ नफा मिळविला आहे. या प्रगतीशील शेतीचा अभ्यास करण्याकरीता अंजली ताटेवार हीने कन्नमवार यांच्या शेतीला भेट दिली.भास्करराव आणि गुलाबराव हे दोन्ही बंधू उच्च शिक्षित असून भास्करराव हे चांदा आयुध निर्माणीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना शेती व्यवसायात आवड असल्याने शेती करायचे ठरविले. त्यात त्यांना भरघोस उत्पन्न मिळून ते यशस्वी शेतकरी ठरले.











